रुद्राक्ष महिमा :
शंकराला अत्यंत प्रिय असलेली आणखी एक वस्तू म्हणजे रुद्राक्ष. शंकराने तपश्चर्येनंतर जेव्हा डोळे उघडले , तेव्हा त्याच्या डोळ्यातून दोन तेजस्वी जलबिंदू पृथ्वीवर पडले व त्यापासूनच रुद्राक्ष वृक्ष निर्माण झाला , असा उल्लेख शिव पुराणात आहे. मोठ्या पापांचा नाशहि रुद्राक्षांमुळे होतो. सारख्या आकाराचे , मजबूत , चिवट व सुंदर आकाराचे , स्वरूपाचे रुद्राक्ष इच्छित गोष्ट साध्य करून देतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्या पुरुषाने मांस, मदिरा, कांदा , लसुन, यांचा त्याग करावा
शंकराला अत्यंत प्रिय असलेली आणखी एक वस्तू म्हणजे रुद्राक्ष. शंकराने तपश्चर्येनंतर जेव्हा डोळे उघडले , तेव्हा त्याच्या डोळ्यातून दोन तेजस्वी जलबिंदू पृथ्वीवर पडले व त्यापासूनच रुद्राक्ष वृक्ष निर्माण झाला , असा उल्लेख शिव पुराणात आहे. मोठ्या पापांचा नाशहि रुद्राक्षांमुळे होतो. सारख्या आकाराचे , मजबूत , चिवट व सुंदर आकाराचे , स्वरूपाचे रुद्राक्ष इच्छित गोष्ट साध्य करून देतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्या पुरुषाने मांस, मदिरा, कांदा , लसुन, यांचा त्याग करावा
रुद्राक्षाचे प्रकार : एकमुखी, व्दिमुखी, तीनमुखी, चार मुखी, पंच मुखी, सहा मुखी, सात मुखी, अष्टमुखी, नवमुखी, दश मुखी, अकरा मुखी,, बारा मुखी, तेरा मुखी, चौदा मुखी,
एकमुखी रुद्राक्ष
प्रत्यक्ष शिवाचे स्वरूप म्हणजे एकमुखी रुद्राक्ष.तो शरीरावर धारण केला असता ,मोक्ष व भोग यांचा लाभ करून देणारा आहे रुद्राक्षाची पूजा ज्या घरात केली जाते,तेथे लक्ष्मी नांदते ,असे शिवपुराणात सांगितले आहे .
सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करवी .त्यानंतर एका स्वच्छ ताम्हनात रुद्राक्ष ठेवावा ,त्यावर अभिषेक करावा.(पाणी घालावे ) .नंतर पुढील मंत्राच्या ११ माला जपाव्यात .
मंत्र :- ॐ –हीं नमः
(१०८ मण्यांची एक माळ असते )
द्विमुखी रुद्राक्ष
द्विमुखी रुद्राक्ष हा देव व देवी संज्ञक आहे.गोहत्येचे पातकही या रुद्राक्षामुळे नष्ट होते; म्हणजेच महापापांचा नाश करणारा हा रुद्राक्ष आहे .तो मनोकामना पूर्ण करणारा आहे.
हा रुद्राक्ष धारण करणाऱ्या साधकाने ,घरातील देवांची प्रथम पूजा करावी .त्यानंतर शंकरावर अभिषेक करावा व पुढील मंत्राच्या ११ माळा जपाव्यात .
मूलमंत्र:- ॐ नमः
तीनमुखी रुद्राक्ष
तीन मुखाच्या रुद्राक्षाला उपासना साधनेत महत्त्व आहे.त्याच्या धारणेमुळे सर्व विद्या प्राप्त होतात .त्रिमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष अग्निस्वरूप आहे .स्त्री-हत्येच्या पापांचा नायनाटही त्यामुळे होतो .वरील दोन प्रकारांप्रमाणे पूजा- विधी करावा व नंतर खालील मंत्राच्या ११ माळा जपाव्यात.
मंत्र :- क्ली नमः
चारमुखी रुद्राक्ष
चारमुखी रुद्राक्ष हा ब्रम्ह स्वरूप आहे .त्याच्या केवळ स्पर्शाने ,दर्शनाने ,धर्म ,अर्थ ,काम व मोक्ष या चारही पुरुषार्थाचा लाभ होतो .सर्व पापांपासून मुक्ती मिळते .पूजाविधी झाल्यावर खालील मंत्राचा ११ माळा जप करावा .
मंत्र :- ॐ –हीं नमः
पंचमुखी रुद्राक्ष
पाच मुखाच्या रुद्राक्षाला कालाग्निरूप मानण्यात येते तो सर्वाना मुक्ती देणारा आहे .मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करून देण्याचे सामर्थ्य त्यात आहे .पूजाविधी झाल्यावर पुढील मंत्राचा ११ माळा जप करावा ,मगच तो धारण करावा .. ॐ –हीं नमः
सहामुखी रुद्राक्ष
सहामुखी रुद्राक्ष हा कार्तिकेयाचे स्वरूप आहे.तो उजव्या बाहूत धारण केला ,तर ब्रम्हहत्येचे पापही नष्ट होते .पुजाविधी झाल्यानंतर पुढील मंत्राच्या ११ माळा जपाव्यात व मगच तो धारण करावा.
मंत्र :- ॐ –हीं हुं नमः
सातमुखी रुद्राक्ष
सातमुखी रुद्राक्ष हा अनंतस्वरूप असून ,तो धारण केला असता ऐश्वर्यप्राप्ती होते .पूजाविधी झाल्यावर खालील मंत्राच्या ११ माळा जप करावा ,मगच तो धारण करावा .सुवर्ण चोरीसारखी पातकेही यामुळे नष्ट होतात .
मंत्र :- ॐ हुं नमः
अष्टमुखी रुद्राक्ष
अष्टमुखी रुद्राक्ष भैरवस्वरूप आहे .आयुष्यवृद्धीला तो उत्तम समजला जातो .माणसाच्या मृत्युनंतर माणूस शिवस्वरूप बनतो .याच रुद्राक्षाला विनायक स्वरूपही मानण्यात येते .
मंत्र ॐ हुं नमः
नवमुखी रुद्राक्ष
नवमुखी रुद्राक्ष हा सुद्धा भैरवस्वरूप आहे .तो कपिल ऋषीचे प्रतिक म्हणूनही ओळखला जातो .या रुद्राक्षाची देवता दुर्गा व महेश्वरी समजण्यात येते .शिव हाच स्वत: भैरव असल्याने याच्या धारणेमुळे महापाताखी नष्ट होते.तो डाव्या बाहूत धारण करावा .पुजाविधी झाल्यावर पुढील मंत्राचा ११ माळा जप करावा मगच तो धारण करावा .
मंत्र ॐ –हीं हुं नमः
दशमुखी रुद्राक्ष
दहामुखाचा रुद्राक्ष हा साक्षात विष्णूस्वरूप आहे .तो धारण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात .हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे ,पिशाच ,वेताळ,राक्षस व इतर अघोरी मार्गापासून साधकांचे रक्षण होते. पूजाविधी झाल्यावर पुढील मंत्राचा ११ माळा जप करावा मगच तो धारण करावा .
मंत्र ॐ –हीं नमः
अकरामुखी रुद्राक्ष
विजयप्राप्तीसाठी,शत्रूवर मात करण्यासाठी ,या रुद्राक्षाचा चांगला उपयोग होतो .कारण तो रुद्रस्वरुप आहे .हा रुद्राक्ष धारण केल्याने साधकास यज्ञ केल्याचे पुण्य मिळते .त्याच्या मनोकामना पूर्ण होतात . पुजाविधी झाल्यावर पुढील मंत्राचा ११ माळा जप करावा मगच तो धारण करावा .
मंत्र ॐ –हीं हुं नमः
बारामुखी रुद्राक्ष
हा रुद्राक्ष केसात धारण करतात .तो धारण केला असता ,डोक्यावर (मस्तकावर )बारा आदित्य (सूर्य )विराजमान होतात .साधक तेजस्वी बनतो .हा रुद्राक्ष मानसिक त्रास नष्ट करणार आहे.त्यामुळे ज्याला वारंवार मानसिक त्रास होतो ,त्याने तो धारण करावा . पुजाविधी झाल्यावर पुढील मंत्राचा ११ माळा जप करावा मगच तो धारण करावा .
मंत्र ॐ क्रौं क्षौं रौं नमः
तेरामुखी रुद्राक्ष
तेरामुखी रुद्राक्ष विश्वेदेवांचे प्रतिक आहे.मनुष्याच्या सर्व मनोकामना यामुळे पूर्ण होतात .मानवाला सौभाग्य व मंगल प्राप्ती घडते . पुजाविधी झाल्यावर पुढील मंत्राचा ११ माळा जप करावा मगच तो धारण करावा .
मंत्र ॐ –हीं हुं नमः
चौदामुखी रुद्राक्ष
चौदामुखी रुद्राक्ष शिवस्वरूप आहे .तो मस्तकावर धारण करतात ,त्यामुळे सर्व पापे नष्ट होतात . पुजाविधी झाल्यावर पुढील मंत्राचा ११ माळा जप करावा मगच तो धारण करावा .
मंत्र ॐ नमः