शिवलिंगपूजनाचा खरा अर्थ
शिवलिंगाचे पूजन कसे करावे
शिवलिंग पूजनाकडे वळण्याआगोदर प्रथम शिवलिंग कसे असावे ते माहित असणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक प्रकारची शिवलिंगे उपलब्ध असतात. साधारणतः संगमरवर, पितळ, पंचधातू, स्फटिक, पारद, काच यांचे बनलेले शिवलिंग वापरतात. जर आर्थिकदृष्य़ा शक्य असेल तर पारद वा स्फटिक शिवलिंग जरूर खरेदी करावे. पारद आणि स्फटिक शिवलिंग आर्थिक भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी चांगली मानली जातात. त्यातही पारद शिवलिंग जास्त लोकप्रिय आहे. पारद शिवलिंग लोकप्रिय असण्याचे अजुन एक कारण म्हणजे पारा हा शंकराचे वीर्य असल्याचे मानले जाते. त्यामागील कथा थोडक्यात अशी...
राक्षसांकडून देवांचा वारंवार पराभव होऊ लागला. त्यामुळे त्रासून जाऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धावले. ब्रह्मदेवाने सांगितले की याला उपाय एकच आणि तो म्हणजे शंकराचा पुत्र. देव काळजीत पडले कारण शंकर तर सदा समाधीत. यावर उपाय म्हणून त्यांनी शंकर आणि पार्वतीला एकांतात क्रिडेकरिता पाठवले आणि आतातरी शिव-पार्वती मिलन होऊन शंकराला पुत्ररत्न होईल अशी आशा करू लागले. मदन, रति आणि वसंत ऋतु यांनाही आपला पूर्ण प्रभाव पाडण्यास त्यांनी विनवले अनेक वर्षे लोटली पण शंकर-पार्वती मिलन काही घडेना. वैराग्यशाली शंकरापुढे मदन काहीच करू शकेना. मग देवांनी अग्निला शंकर-पार्वती मिलन घडले की नाही हे पाहण्यासाठी पाठवले. अग्नि याचक बनुन तेथे गेला. मिलन घडले नाही असे कळताच त्याने शंकराजवळ इच्छित बस्तुची याचना केली. शंकर बैरागी त्याच्या जवळ याचकाला देण्यासाठी काय असणार? म्हणून अग्निने शंकराचे वीर्य मागितले. शंकरानेही पुढील भविष्यार्थ जाणून आनंदाने होकार दिला. दिलेल्या वीर्याचे तेज प्रत्यक्ष अग्निही सहन करू शकला नाही. त्याने ते गंगेत टाकले. गंगाही ते वीर्य धारण करू शकली नाही. गंगेने ते पृथ्वीवर लोटले. पृथ्वीवर आलेले ते शिववीर्य म्हणजेच पारा!
पारा हा एकमेव धातू असा आहे की जो द्रव स्वरुपात आढळतो. पार्याचा गन्धकाशी संयोग करून आणि त्यावर अजुनही काही जटील प्रक्रिया करून पारद बनवले जाते. पारद शिवलिंग किंमतीच्या दृष्टीने जरा महाग असते. साधारणतः ते ग्रॅमच्या भाषेत विकले जाते. छोट्या आकाराचे असली शुद्ध पारद शिवलिंग सहज चार ते पाच हजाराच्या घरात जाऊ शकते. बहुतांशी दुकानांमधे किंमतीची ही अडचण लक्षात घेऊन काहिसे अशुद्ध पारद वापरले जाते. असे जरी असले तरी उपासनेच्या दृष्टीने ते जवळजवळ सारखेच प्रभावी असते. कमी प्रतीचे पारद लवकर काळपट होते. जर ते काळपट झाले तर त्यावर लिंबाचा रस लावून कोरड्या खरखरीत कापडाने पुसावे. काळपटपणा जाऊन ते परत लखलखीत होते.
शिवलिंग मग ते कोणत्याही पदार्थाचे बनलेले असो, आपल्या स्वतःच्या अंगठ्या एवढे उंच असावे असे सांगितले जाते. जर कमी असेल तर उपासनेच्या फलात कमतरता येते. जास्त मोठे असेल तर काही हरकत नाही. पण अर्थात प्रत्येकाने आपली आर्थिक कुवत बघुन आणि तारतम्य बाळगुन याबाबतचा निर्णय घ्यावा.
नवीन शिवलिंग एकदा घरात आणले की ते उपासनेस वापरण्यापूर्वी सिद्ध करावे लागले. आजकाल या सिद्धीकरणाच्या नावाखाली फार खोटेपणा चालतो. काही दुकानदार आपण विकत असलेले शिवलिंग सिद्ध केलेले आहे असे सांगुन जास्त पैसे उकळतात. काही वेब साईटस तर सिद्ध करत असतानचे फोटो वगैरेही दाखवतात. सुज्ञ वाचकांना त्यात काय खरे आणि काय खोटे हे सांगण्याची गरज नाही. काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या पॅकिंग वरून पंचामृताने स्नान घालण्यासारखे हास्यास्पद प्रकारही घडतात. थोडे विषयांतर झाले तरी येथे एखादे यंत्र वा लिंग सिद्ध करणे म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो. जेव्हा एखाद्या कारखान्यात वा दुकानात यंत्र वा शिवलिंग बनते तेव्हा ते केवळ जड पदार्थ असते. त्यात शक्ती नसते. असे समजा की हाडामासाचा देह आहे पण प्राण नाही. त्यात उर्जा प्रस्थापित झालेली नसते. ही उर्जा कशी स्थापावी याचे एक शास्त्र आहे. त्यासाठी अत्यंत प्रबळ संकल्पशक्ती असावी लागते. कुंडलिनी जागृत असावी लागते. प्राण-संक्रमण म्हणजे काय ते माहित असावे लागते. आजकाल अनेक लोक पुस्तकांत वाचून यंत्रे सिद्ध करतात. लोकांचा असा समज असतो की काही मंत्र म्हटले आणि पूजा केली की झाले यंत्र सिद्ध! भौतीक पदार्थांनी केलेली पूजा यंत्रात प्राण कसा ओतणार? हाच प्रकार मंत्राच्या बाबतीत होतो. बहुतेक उपासक सुरवातीला तरी आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत नसतात. त्यांनी म्हटलेले चैतन्यहीन मंत्र यंत्रात शक्ती कशी ओतणार? मग साधक अपेक्षित फळ मिळाले नाही वा कमी मिळाले म्हणून तक्रार करतात. म्हणूनच प्राचीन काळी शैव दिक्षेच्या वेळी गुरू शिष्याला स्वतः सिद्ध केलेले शिवलिंग देत असत. अर्थात काहीच संस्कार न केलेल्या शिवलिंगापेक्षा अप्रगत साधकाने संस्कारीत केलेले शिवलिंग केव्हाही श्रेष्ठच ठरते.
शिवलिंग आणल्यावर त्याची जागा निश्चित करावी. घरच्या देव्हार्यात ठेवले तर सगळ्यात उत्तम. काही उपासक कपाट, टेबलाचा खण, साधनेची जागा अशा ठिकाणीही ते ठेवतात. कोठेही ठेवले तरी त्याचे पावित्र्य राखले जाईल, ते धुळ खात पडणार नाही याची काळजी घ्यावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवलिंगाची रोज पूजा करावी. ज्यांना काही कारणाने हे शक्य नाही त्यांनी निदान दर सोमवारी तरी ती करावी. जर आपल्याला शिवलिंगाची काळजी घेणे आणि त्याचे पावित्र्य राखणे शक्य नसेल तर शिवलिंग आणण्यापेक्षा दर सोमवारी वा जमेल तेव्हा शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शिवलिंग आणल्यावर मग त्याकडे दुर्लक्ष करून त्याचा अपमान करू नये.
अभिषेकाचासहित शिवपूजनाचा शास्त्रोक्त विधी शिवपूराणात किंवा बाजारात मिळणार्या पुजेच्या पुस्तकांत सहज मिळण्यासारखा आहे. पण आजच्या धावपळीच्या काळात बहुतेकांना असे विस्तृत शिवपूजन करणे शक्य होत नाही, वेळेच्या दृष्टीनेही आणि पैशाच्या दृष्टीनेही. तेव्हा येथे सर्वांना सुलभपणे करता येईल असा विधी देत आहे. ज्यांना यथाविधी पूजन करायचे असेल त्यांनी एकाद्या पुरोहिताकरवी ते करवून घ्यावे हे उत्तम.
आपल्याकडे पूजनाचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. पंचोपचार, षोडशोपचार, मानसपुजा वगैरे. त्यापैकी पंचोपचार पुजा आजच्या काळात बहुतेकांना करता येण्यासारखी आहे. पंचोपचार पुजेमध्ये पाच वस्तुंचा उपयोग केला जातो. त्या पाच वस्तु म्हणजे गन्ध, फुले, धुप, दिप आणि नैवेद्य. भारतातल्या अनेक घरांमधे रोज पंचोपचार पुजा केली जाते पण यापुजेचा खरा अर्थ फारच थोड्यांना माहित असतो. मानवी शरीर पंचमहाभुतांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश ही ती पाच तत्वे. परमेश्वर या पाच तत्वांचा जनक असला तरी यांपासून वेगळा आहे. कुंडलिनी योगशास्त्राप्रमाणे पंचमहाभुतांचे वास्तव्य अनुक्रमे मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत आणि विशुद्धी या चक्रांपाशी आहे. या चक्रांच्या वरचे चक्र आज्ञाचक्र म्हणून ओळखले जाते. तेच शिवस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. कुंडलिनी योगशास्त्रानुसार परमशिवाशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे लय वा प्रतिप्रसव. म्हणजेच पंचमहाभुतांचा लय केल्याशिवाय शिवतत्व हाती येणार नाही. पंचोपचार पुजनामधे अर्पण केले जाणारे पदार्थ प्रत्यक्षात पंचमहाभुतांचे प्रतिक आहेत. गन्ध हे पृथ्वीतत्वाचे, पुष्प हे आकाशतत्वाचे, दिप हे अग्नितत्वाचे, धुप हे वायुतत्वाचे आणि नैवेद्य हे जलतत्वाचे प्रतिक आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराला गन्ध, फुले वाहता वा निरांजनाने ओवाळता तेव्हा आपला पंचमहाभुतात्मक देह परमेश्वराच्या चरणी अर्पण करत आहोत ही भावना हवी. कुंडलिनीयोग साधकाने हीच भावना त्या त्या चक्राच्या शुद्धीबद्दल बाळगावी. केवळ यांत्रिकपणे गन्ध-फुले वाहण्यापेक्षा या समर्पणाच्या भावनेने पुजा केली तर शतपटीने अधिक फायदा मिळेल. असो तर आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू.
प्रथम आणलेले शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवावे. बाजारातून आणलेले शिवलिंगा अनेकदा हाताळल्याचे ठसे, रंग, माती इत्यादी गोष्टींनी मलिन झालेले असते. म्हणून ते सर्वप्रथम स्वच्छ करावे. यासाठी गंगाजल वापरता आले तर उत्तमच. त्यानंतर शिवलिंगाला पंचामृताने (दुध, दही, तुप, मध, साखरपाणी) स्नान घालावे. मग परत गंगाजलाने शिवलिंगाला स्नान घालावे. पंचामृताने आलेला ओशटपणा आणि चिकटपणा जाईल याची काळजी घ्यावी. त्यानंतर शिवलिंग देव्हार्यात वा तबकात ठेवावे. मग खालील मंत्र म्हणत पंचोपचार पुजा करावी.
ॐ लं पृथिव्यात्मकं गन्धं परिकल्पयामि।
असे म्हणत शिवलिंगाला गंध लावावे. मनात आधी सांगितल्याप्रमाणे समर्पणाचा भाव ठेवावा.
ॐ हं आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामि।
असे म्हणत शिवलिंगाला फुले आणि बेलाची पाने वहावीत. बेलाचे पान तम, रज आणि सत्व या त्रिगुणांचे प्रतीक आहे. फुले शक्यतो पांढर्या रंगाची असावीत. पांढरा रंग निर्मळ, निरंजन परमात्याचे प्रतिक आहे.
ॐ यं वाय्व्यात्मकं धुपं परिकल्पयामि।
असे म्हणत धुप वा अगरबत्ती लावावी. कृत्रिम रसायनांनी बनवलेल्या अगरबत्तीपेक्षा धुप, लोबान वा गुग्गुळ वापरणे चांगले.
ॐ रं वह्न्यात्मकं दीपं दर्शयामि।
असे म्हणून निरांजन ओवाळावे. निरांजनात शक्यतो गाईचे तुप वापरावे.
ॐ वं अमृतात्मकं नैवेद्यं निवेदयामि।
असे म्हणत नैवेद्य दाखवावा.
ॐ सौं सर्वात्मकं सर्वोपचारं समर्पयामि।
असे म्हणत मनानेच आपले सर्वस्व श्रीशंकराच्या चरणी अर्पण करत आहोत अशी भावना ठेवून नमस्कार करावा.
(कुंडलिनी योगसाधकांनी पंचतत्वांचे बीजमंत्र आणि चक्रांचे बीजमंत्र यांतील साधर्म्य लक्षात घ्यावे)
जर मंत्र म्हणणे काही कारणाने शक्य नसेल तर एकामागून एक नुसते उपचार अर्पण करावेत. जर फुले, धुप, दीप इत्यादी गोष्टी काही कारणाने उपलब्ध नसतील तर केवळ मनानेच मंत्र म्हणत तो तो उपचार अर्पण करत आहोत अशी भावना ठेवावी. मनोमन पुजनात काही कमतरता राहिली असेल तर त्याबद्दल क्षमायाचना करावी.
वरीलप्रकारे पूजन झाल्यानंतर शिवलिंगासमोरच साधनेचे आसन टाकावे. येत असल्यास प्रथम दहा-बारा वेळा नाडिशोधन प्राणायाम करावा. जर आपण कुंडलिनी योगमार्गावरचे प्रगत साधक असाल तर सुषुम्ना चालु करावी (ती कशी करावी ते शब्दात सांगण्याचा विषय नाही). तदनंतर पंचाक्षर मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र कमीतकमी 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेवर म्हणावा. अकरा माळा जमल्यास उत्तम. माळ नसेल तर घडाळ्यावर मोजून तो म्हणवा. मंत्र म्हणत असताना शिवलिंगाकडे एकाग्रचित्ताने पहात शिवतत्व आपल्यावर प्रसन्न होत आहे अशी भावना ठेवावी. मंत्रजप पूर्ण झाल्यावर परत नाडिशोधन प्राणायाम करावा. त्यानंतर डोळे मिटून शिवध्यान करावे वा अजपा ध्यान करावे. आसनावरून उठण्यापूर्वी शंकराचे एखादे स्तोत्र म्हणावे आणि मग उठावे.
पंचामृताने स्नान रोज घालण्याची गरज नाही पण निदान शिवरात्रीच्या दिवशी घालावे. वरील संपूर्ण विधी रोज करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या कुवतीनुसार जेवढे जमेल तेवढे करावे. पुजनाने भक्तीवर्धन झाले पाहिजे हे लक्षात ठेवावे. केवळ यांत्रिकपणे पुजन करून काही उपयोग नाही.शंकराचे एक नाव आशुतोष अर्थात भक्तावर लवकर प्रसन्न होणारा असे आहे तेव्हा मनात भक्ती असेल तर सदाशिव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.
श्रीशंकराचे पवित्र प्रतीक - शिवलिंग
साधारणतः साधक आपल्या उपास्य दैवताच्या पुजाअर्चनेसाठी मुर्ती अथवा तसबीर वापरतात. श्रीशंकराची उपासना मात्र सगुण आणि निर्ग़ुण अशा दोन्ही रुपात केली जाते. शिवशंकराची मुर्ती वा तसबीर शिवोपासनेत सगुण प्रतीक म्हणून वापरली जात असली तरी खर्या अर्थाने शिवलिंग हेच शंकराचे प्रतीक मानले जाते. बहुतेक सर्व शिव मंदिरांमधे शिवलिंगाच्या निर्ग़ुण प्रतीकाच्या माध्यमातूनच शंकराची पूजा केली जाते. शंकराची बारा ज्योतिर्लिंगे प्रसिद्धच आहेत. शिवलिंगाचा अर्थ काय, त्याचा उगम कसा झाला, त्याचे पूजन कसे करावे या विषयी शिवपुराणामधे सविस्तर वर्णन आढळते. त्या आधारानेच आपणही या गोष्टी जाणून घेणार आहोत...
सृष्टीच्या आरंभापूर्वी सर्वकाही निर्ग़ुण निरामय ब्रह्मच होते. हे ब्रह्म सत्य, ज्ञानस्वरूप, आधाररहित, निर्विकार, निराकार, निर्ग़ुण, योहिगम्य, सर्वव्यापी, निर्विकल्प, निरारम्भ, मायाशून्य, उपद्रवरहित, अद्वितीय, अनादी, अनंत, संकोच-विकास रहित आणि चिन्मय असे एकटेच पहुडले होते. हे ब्रह्म शैव दर्शनात परमशिव म्हणूनही ओळखले जाते. अशा या निर्ग़ुण ब्रह्मतत्वाच्या मनात आपण अनेक व्हावे अशी इच्छा निर्माण झाली. त्याबरोबर ते निर्ग़ुण तत्व सगुण झाले आणि सदाशिवाच्या रूपात प्रगट झाले. सदाशिवाने आपल्याच इच्छेने शक्तितत्वाची निर्मीती केली. शिव आणि त्याची शक्ती क्षणभरसुद्धा एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. जेथे शिव तेथे शक्ती आणि जेथे शक्ती तेथे शिव असा प्रकार आहे. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. या शक्तीलाच जगदंबा, अंबिका, प्रकृती, सर्वेश्वरी, त्रिदेवजननी, नित्या, मूलकारण अशा अनेक नावांनी ओळखले जाते. शिव आणि शक्ती आपल्याच लीलेने क्रिडा करू लागले.
क्रिडा करत असताना त्यांच्या मनात आले की आता अजूनही सृष्टी निर्माण करावी. पण सृष्टीनिर्मीतीच्या कार्यामुळे आपल्या क्रिडेत भंग यायला नको म्हणून अन्य कोणाची तरी नियुक्ती या कामी करावी असे उभयतांनी ठरवले. त्यानुसार सदाशिवाने आपल्या डाव्या अंगातून एका तेजस्वी पुरुषाची निर्मीती केली. त्या तेजस्वी पुरुषाला शिवाने विष्णु असे नाव दिले. जगाची रचना करण्याचे ज्ञान विष्णुला मिळावे म्हणून शिवाने स्वासावाटे वेद विष्णुला प्रदान केले. त्यानंतर विष्णु कठोर तप करू लागला. तपस्येच्या श्रमाने त्याच्या शरीरातून घाम अर्थात जलधारा वाहू लागल्या. सर्वत्र ते जल भरून राहिले. थकलेल्या विष्णुने त्यातच दिर्घकाळ निद्रा घेतली. जल शब्दाला एक प्रतिशब्द आहे 'नार' आणि त्यात शयन करणारा तो 'नारायण'.
नारायण निद्रेत असताना सदाशिवाच्या इच्छेने त्याच्या नाभीतून एका कमळाचा उद्भव झाला. ते कमळ अतिशय सुंदर होते. तेजस्वी आणि प्रकाशमान होते. त्या कमळावर शिवइच्छेनुसार ब्रह्मदेवाचा जन्म झाला. विष्णुची उत्पत्ती शिवाच्या डाव्या अंगातून झाली तर ब्रह्मदेवाची उजव्या अंगातून. जन्म झाल्याबरोबर ब्रह्मदेवाला आपण कोठून आलो? आपले कार्य काय? असा प्रश्न पडला. आपला जन्म या कमळातून झाला आहे तेव्हा या कमळाचे मुळ शोधले पाहिजे असे समजून ब्रह्मदेव कमळाच्या मुळाशी पोहोचला. त्याला असे दिसले की ते कमळ विष्णुच्या नाभीतून प्रसवलेले आहे. विष्णुने ब्रह्मदेवाला पाहिले आणि ब्रह्मदेवाने विष्णुला. दोघांनीही एकमेकांना प्रणाम केला. विष्णुने ब्रह्मदेवाला 'मुला' असे संबोधताच ब्रह्मदेवाला राग आला. दोघांमधे मी श्रेष्ठ की तु श्रेष्ठ असे भांडण सुरू झाले. बराच काळ भांडण सुरू होते पण वादाचा निकाल काही लागेना. त्याचवेळेस त्या दोघांमधे एक अत्यंत तेजस्वी अग्निस्तम्भ प्रगट खाला. दोघांनाही हे कळेना की आपल्या भांडणात हा तिसरा कोण आला. तो अग्निस्तम्भ अतिशय विशाल होता. त्याची सुरवात आणि शेवट कोठे आहे हेच त्या दोघांना कळत नव्हते. तेव्हा त्यानी असे ठरवले की ब्रह्मदेवाने स्तंभाच्या वरच्या भागाचा उगम शोधावा आणि विष्णुने खालच्या भागाचा. त्यानुसार दोघेही त्या अग्निस्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यासाठा वेगाने निघाले. बराच काळ व्यतीत झाला पण त्या स्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यात त्यांना अपयश आले. अत्यंत थकून दोघेही आपापल्या मुळ जागी परत आले. त्यांना कळले की ना विष्णु श्रेष्ठ आहे ना ब्रह्मदेव. त्यांनी त्या अग्निस्तंभाला भक्तीभावाने नमस्कार केला आणि प्रार्थना केली 'हे महाप्रभो! आपण कोण आहात ते आमच्या आकलनापलिकडचे आहे. कृपया आपली यथार्थ ओळख द्या'. या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे अवतीर्ण झाले. सदाशिव म्हणाले, "मी सृष्टीकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता आहे. निर्ग़ुण आहे आणि सगुणही. सत-चित-आनन्द हे माझे खरे रूप आहे. विष्णु माझ्या डाव्या अंगापासून निर्माण झाला आहे तर ब्रह्मा उजव्या अंगापासून. माझ्या आज्ञेने ब्रह्माने सृष्टीच्या निर्मीतीचे कार्य करावे तर विष्णुने पालनाचे. सृष्टीचा संहार करण्याचे काम माझाच प्रत्यक्ष अंश रुद्र रूपाने करेन. रुद्र ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटी मधून प्रगटेल." असे सांगून शिव अंतर्धान पावला. शिवाज्ञा शिरसावन्द्य मानून ब्रह्मा आणि विष्णु आपापल्या नेमून दिलेल्या कार्यात मग्न झाले. विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या वादाच्यावेळी जो अग्निस्तंभ प्रगट झाला तो म्हणजेच शंकराचे पवित्र शिवलिंग आणि शिवलिंग ज्या दिवशी प्रगट झाले तो दिवस म्हणजेच शिवरात्रीचा पावन दिवस!
नाथयोग शिरोमणी श्रीगोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध-सिद्धांत पद्धती नामक ग्रंथात (जो नाथ पंथाचे तत्वज्ञान विशद करणारा अतिशय महत्वाचा प्रमाण ग्रंथ आहे) एकटे शिवतत्वच या जगदनिर्मीतीला कसे कारणीभूत आहे ते सांगताना शिव ते ब्रह्मदेव ही स्थुल उत्क्रांती शिव - भैरव - श्रीकंठ - सदाशिव - इश्वर - रुद्र - विष्णु - ब्रह्मदेव अशा प्रकारे दिली आहे. येथे रुद्र शिवतत्वाचा प्रत्यक्ष अंश असल्याने विष्णुच्या आधी आला आहे हे लक्षात घ्यावे.
कुंडलिनी योग साधकांनी येथे काही गूढ संकेत लक्षात घ्यावेत. शंकराने विष्णुला वेद स्वासातून देणे आणि अजपा साधनेचे शैव दर्शनातील महत्व हा दुवा महत्वाचा आहे. तसेच शिव-शक्ती अभिन्नत्व आणि योगग्रंथातील 'मुलाधारात शिवच शक्तीरूपात राहतो' अशा सारखे श्लोक एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगत आहेत हे लगेच समजण्यासारखे आहे. षटचक्रांमधे स्वयंभू, बाण इत्यादी शिवलिंगांची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. योगशास्त्रानुसार स्वाधिष्ठान चक्रात ब्रह्मदेवाची, मणिपूरात विष्णुची आणि अनाहत चक्रात रुद्राची केलेली कल्पनाही महत्वाची आहे. ब्रह्मदेवाचे निर्मीतीचे कार्य आणि प्रजनन इंद्रियांचा जवळचे स्वाधिष्ठान चक्र, विष्णुचे पालनाचे कार्य आणि मणिपुर चक्राचे उदरसंस्थेवरचे नियंत्रण, रुद्राचा संहार आणि हृदयातील षडरिपूंचा आणि भौतिक भावभावनांचा नाश, रुद्राचे भ्रुकुटीमधून प्रगटणे आणि आज्ञा चक्राचे महत्व या सर्वच गोष्टी एकमेकाशी अगदी चपलख जोडता येतात. असो.
ही झाली शिवलिंगामागची पौराणिक कथा. आता शिवलिंगाच्या तात्वीक आणि आध्यात्मिक अर्थाकडे वळू. तुम्ही कोणत्या न्या कोणत्या देवळात शिवलिंग पाहिलेच असेल. शिवलिंगाचे दोन भाग असतात. एक जो उभट स्तंभासारखा दिसतो तो आणि दुसरा जो पसरट दिसतो तो. पहिला भाग म्हणजे लिंग आणि दुसरा भाग म्हणजे योनी. या दुसर्या भागाला पीठ, वेदिका, जलधारा, जलहरी असेही म्हणतात. येथे लिंग आणि योनी म्हणजे शरीरावयव नव्हेत तर त्यांना शैव दर्शनामधे एक गूढ सांकेतीक अर्थ आहे. शिवपुराणातच हा अर्थ विषद करण्यात आला आहे.
लिंगमर्थं हि पुरुषं शिवं गमयतीत्यदः।
शिवशक्त्योश्च चिन्ह्यस्य मेलनं लिंगमुच्यते॥
शिवशक्त्योश्च चिन्ह्यस्य मेलनं लिंगमुच्यते॥
याचा अर्थ असा की शिवलिंगामधील लिंग म्हणजे शिव आणि योनी म्हणजे शक्ती. अर्थात शिवलिंग शिवशक्ती यांचे मिलन आणि एकता दर्शवते. लिंग म्हणजे वैश्वीक पुरुषतत्व आणि योनि म्हणजे वैश्वीक स्त्रीतत्व अर्थात प्रकृती. शैव मतानुसार ही सारी सृष्टी शिव आणि शक्ती यांचा खेळ आहे. शिव आणि शक्ती एकमेकाहून भिन्न राहुच चकत नाहीत. किंबहुना शिव आणि शक्ती हे खरेतर भिन्न नाहितच तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यालाच अद्वयवाद असे म्हटले जाते. अर्धनारीनटेश्वर या अद्वयवादाचेच प्रतीक आहे. आपल्याकडे पत्नीला अर्धांगीनी म्हटले जाते ते याच अर्थाने. संसाराचा गाडा दोघांनी एकत्र ओढल्याशिवाय चालूच शकत नाही हे त्यातून अभिप्रेत असते. अद्वयवाद अद्वैतवादापेक्षा भिन्न कसा याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नाही पण थोडक्यात सांगायचे तर अद्वैतवादात शक्ती वा माया हीचे अतित्वच नसते. ती दोरीवरील सर्पाच्या आरोपाप्रमाणे मित्थ्या मानली जाते. अद्वयवादात मात्र परमेश्वर आणि त्याची शक्ती हे दोनही सत्य असून त्यांचे नाते चन्द्र आणि चांदणे, दिप आणि प्रकाश यांच्यासारखे अभिन्नत्वाचे असते. भगवत गीतेतही हेच तत्व थोड्या निराळ्याप्रकारे सांगितले आले. गीता 'पुरुष आणि प्रकृति ही अनादी तत्वे आहेत' असे ठामपणे सांगते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात :
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन गर्भं दधाम्यहम।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत॥
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत॥
शिव जन्म कसा झाला ? सृष्टीचा मारता जो ब्रम्हदेव त्याला चार पुत्र होप्ते. सृष्टीच्या निर्मितीनेन्तर ब्रम्हदेवाने आपल्या पुत्रांस विनंती केली कि , हे पुत्रानो तुम्ही आता योग्य वयाचे झाला आहात; तेव्हा प्रजोत्पाद्नाचे कार्य हाती घ्य. त्या चोघानीही त्यास नकार दिला प्रत्यक्ष मुलांनी आपली आज्ञा मोडली , हे पाहून ब्राम्ह्देवाना अतिशय संताप आला. राग बाहेर पडू लागला . क्रोध वाडू लगल. त्या क्रोधातूनच एक बालक बाहेर पाप्डलेले ब्राह्न्देवास दिसले. जन्मत:च ते बालक जोरजोराने रडू लागले . समोर असणार्या ब्रह्मदेवास त्याने विचारले , 'माझे नाव काय? माझे कार्य काय ? ' तेव्हा ब्रम्हदेव त्यास म्हणाला ,' हे बालका , शांत हो ! जन्माला आल्याबरोबर तू र्द्न्यास प्रारंभ केलास, त्यामुळे तू 'रुद्र ' म्हणूनच ओळखला जाशील. आकाश , वायू, जल, सूर्य, अग्नी , तण या ठायी तुझे वास्तव्य राहील.
शिव व बेल :
भारतीय पूजा विधीमध्ये निरनिराळ्या वृक्षांना महत्व देण्यात आले आहे. गणपतीला दुर्वा प्रिय आहेत , तर कृष्णाला व श्रीविष्णूला तुळस प्रियं आहे. त्याच प्रमाणे शिवाला बेल फार प्रिय आहे. बेलाच्या झाडाच्या मुळाशी, शंकराचे लिंग स्थापन करून जो त्याचे पूजन करतो, त्याच्या बाबतीत काल्यांकारक अशाच घटना घडतात. जी व्यक्ती शिवलिंगावर अबुइशेक घालते त्या व्यक्तीस सर्व तीर्थांच्या स्नानाचे फळ मिळते. बेल वाहताना म्हणावयाचा मंत्र :
भारतीय पूजा विधीमध्ये निरनिराळ्या वृक्षांना महत्व देण्यात आले आहे. गणपतीला दुर्वा प्रिय आहेत , तर कृष्णाला व श्रीविष्णूला तुळस प्रियं आहे. त्याच प्रमाणे शिवाला बेल फार प्रिय आहे. बेलाच्या झाडाच्या मुळाशी, शंकराचे लिंग स्थापन करून जो त्याचे पूजन करतो, त्याच्या बाबतीत काल्यांकारक अशाच घटना घडतात. जी व्यक्ती शिवलिंगावर अबुइशेक घालते त्या व्यक्तीस सर्व तीर्थांच्या स्नानाचे फळ मिळते. बेल वाहताना म्हणावयाचा मंत्र :
त्रिदल त्रिगुणाकारं त्रिनेत्र च त्र्यायुध ।
तरी जन्म्पापसहारम एकं बिल्व शिवार्पणम ।।
तरी जन्म्पापसहारम एकं बिल्व शिवार्पणम ।।
शिवरात्र महात्म्य :
शिवाच्या उपासानांपैकी महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्याला प्रत्येक सोमवारी उपवास करणे जमत नाही त्याने श्रावण महिन्यातले तरी उपवास करवेत. हे करणेसुद्धा ज्याला जमत नाही त्याने महाशिवरात्रीचा उपवास तरी करावा. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीस शिवरात्र असतेच, पण माघ महिन्यातल्या शिवरात्रीस महाशिवरात्र म्हणतात. शिव पुअरनत याचे महात्म्य वर्णन केले आहे. शिवरात्रीने शिव अधिक संतुष्ट होतो. तेंव्हा मोक्ष व भोग इच्छिनाऱ्या साधकाने हे शिवरात्र व्रताच करावे.
शिवाचे अवतार : दुर्वासावतार , हनुमान अवतार , व्दिजेश्वर अवतार , यातीनाथांचा अवतार, कृष्णदर्शन अवतार, अवधुतेश्वरावतार, भिक्शुवार्यावतार
शिव पूजा :
शिवोपासनेत शिवाची लिंगरुपानेच पूजा करतात. ॐ नम: शिवाय या मंत्राने पूजन करतात; कारण या मंत्राने धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचा लाभ होतो. सर्व लोकांवर कृपा करण्यासाठी शिव शिवलिंगातच वास्तव्य करून राहिला आहे, असे पुराणात सांगितले आहे. शिव लिंग पूजनामुळे मोक्ष व भोग प्राप्त होते. पूजेसाठी सोवळे अथवा धूत वस्त्र नेसावे . उतरेकडे तोंड करून बसावे व प्रार्थना करावी, ' हे महादेव, आज मी तुझी पूजा यथाविधी यथाशक्ती करणार आहे, ती गोड मानून घे. मी अज्ञानी आहे माझ्या हातून चूक झाली तर मला माफ कर. ' शिवाची अशी पूजा केल्यानंतर पूजेच्या जागी शिवलिंग ठेवावे. नंतर १०८ वेळा नम: शिवाय! या मंत्राचा जप करावा. आता त्या लिंगाच्या ठिकाणी शिवाने वास्तव्य केले आहे असे मानून पुढील मंत्र म्हणून शिवाची पंचामृताने पूजा करावी.
शिवोपासनेत शिवाची लिंगरुपानेच पूजा करतात. ॐ नम: शिवाय या मंत्राने पूजन करतात; कारण या मंत्राने धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचा लाभ होतो. सर्व लोकांवर कृपा करण्यासाठी शिव शिवलिंगातच वास्तव्य करून राहिला आहे, असे पुराणात सांगितले आहे. शिव लिंग पूजनामुळे मोक्ष व भोग प्राप्त होते. पूजेसाठी सोवळे अथवा धूत वस्त्र नेसावे . उतरेकडे तोंड करून बसावे व प्रार्थना करावी, ' हे महादेव, आज मी तुझी पूजा यथाविधी यथाशक्ती करणार आहे, ती गोड मानून घे. मी अज्ञानी आहे माझ्या हातून चूक झाली तर मला माफ कर. ' शिवाची अशी पूजा केल्यानंतर पूजेच्या जागी शिवलिंग ठेवावे. नंतर १०८ वेळा नम: शिवाय! या मंत्राचा जप करावा. आता त्या लिंगाच्या ठिकाणी शिवाने वास्तव्य केले आहे असे मानून पुढील मंत्र म्हणून शिवाची पंचामृताने पूजा करावी.
ॐ शिवाय नम: पाधं समर्पयामी |
ॐ महेश्वराय नम: अर्घ्यं समर्पयामी ||
ॐ शंभवे नम: अर्घ्यान्ते आचमनियं समर्पयामी |
पनचम्रुतं मयनितं पेयादधीघृत मधु शर्करा च समायुक्तं स्नानार्थ प्रतीग्रह्यतां ||
ॐ महेश्वराय नम: अर्घ्यं समर्पयामी ||
ॐ शंभवे नम: अर्घ्यान्ते आचमनियं समर्पयामी |
पनचम्रुतं मयनितं पेयादधीघृत मधु शर्करा च समायुक्तं स्नानार्थ प्रतीग्रह्यतां ||
एवढे म्हणून दुध , दही तूप, मध व साखर यांनी शिवास स्नान घालावे. त्यानंतर 'ॐ पार्थिवेश्व्राय पुष्पांजली समर्पयामी' असे म्हणून फुले वाहावीत व ती स्वीकारण्याची विनंती शिवास करावी. त्यानंतर शिवाची प्रार्थना करावी. ज्यांना प्रार्थना म्हणता येणार नाही, त्यांनी असे म्हणावे , ' हे महेश्वर , तू मला रूप, विजय, सॉभाग्य, पुत्रपौत्र, धनधान्य , आदी सर्वांच्या प्राप्तीसाठी मदत कर. ' यानंतर नम: शिवाय !' या मंत्राचा एकचित्ताने १ ० ८ वेळा जप करावा.
नंतर गंध, पुष्प अर्पण करून शिवाची आरती करावी. यानंतर हातात अक्षदा घ्याव्या व त्या शिवलिंगावर अर्पण करून , पूजेचे विसर्जन करावे.
पारद शिवलिंग

" मृदः कोटीगुणं स्वर्ण स्वर्णात्कोटि गुणं मणि। मणेः कोटीगुणं बाणो बाणात्कोटी गुणं रसः स्वात्परतरं लिंग नभूतो न भविष्यति ।। "
शिव निर्णय रत्नाकर
माती किंवा दगडाच्या शिवलिंगाच्या पुजनाच्या फळापेक्षा करोडपटीने फळ स्वर्णनिर्मीत शिवलिंगाच्या पुजनाने मिळते सुवर्णापेक्षा करोडपटीने मणी आणि मणीपेक्षा करोडपटीने अधिक फळ बाणलिंग नर्मदेश्वराच्या पुजनाने मिळते नर्मदेश्वर बाणलिंगपेक्षा करोडपटीने अधिक फळ पारद शिवलिंगाच्या पुजनाने किंवा दर्शनाने प्राप्त होते।
पारद निर्मीत शिवलिंगापेक्षा श्रेष्ठ शिवलिंग न या संसारात आहे व होणारही नाही। भगवान शंकरानी स्वतः म्हटले आहे की व्दादश ज्योतीर्लिंगाच्या दर्शनापेक्षा पारद शिवलिगांचे दर्शन घेणारा व्यक्ती मला अधिक प्रिय आहे।
" रसलिंग महालिंगम शिवशक्ती निकेतम । लिंग शिवालय प्रोक्त सिद्धींद सर्व देहीनाम ।। योग शिखोपनिशद रसलिंग (पारदलिंग) हे महालिंग आहे। याला शिवशक्तीचे घर (शिवालय) म्हणू शकतात। हे प्राप्त होण्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात मग त्या अध्यात्मिक असो की भौतीक सर्व प्राप्त होवून सर्व इच्छा पूर्ण होतात। अभ्रकं तव बिजं तु मम बिजं तु पारदः । बद्धो पारद लिंगो यं मृत्यू दारिद्रय नाशनम् ।। सर्वदर्शन संग्रह। "
माती किंवा दगडाच्या शिवलिंगाच्या पुजनाच्या फळापेक्षा करोडपटीने फळ स्वर्णनिर्मीत शिवलिंगाच्या पुजनाने मिळते सुवर्णापेक्षा करोडपटीने मणी आणि मणीपेक्षा करोडपटीने अधिक फळ बाणलिंग नर्मदेश्वराच्या पुजनाने मिळते नर्मदेश्वर बाणलिंगपेक्षा करोडपटीने अधिक फळ पारद शिवलिंगाच्या पुजनाने किंवा दर्शनाने प्राप्त होते।
भगवान शंकर स्वतः भगवती मातेला म्हणतात की जो पायाला लिंगाचा आकार देवून पुजन करतो त्याला जीवनामध्ये मृत्यूभय उरत नाही आणि कोणत्याही परीस्थीतीत त्याच्या घरी दरिद्रता येत नाही। जो व्यक्ती पारद शिवलिंगाची पुजा करतो त्याच्या सारखा सौभ्यागशाली दुसरा कोणताही व्यक्ती नाही। ज्या वास्तूत हे पारदशिवलिंग स्थापन केलेले असते तिथले सर्व वास्तूदोष नाहीसे होतात। सपूर्ण नकारात्मक शक्ती नकारात्मक शक्ती नकारात्मक उर्जा यांचा सपूर्ण परीणाम संपून जातो। मग तो तात्रिंक प्रयोग असो की ग्रहाचे दोष असो भूत प्रेत पिशाच्च त्रास देत असतील तर ते क्षणात निघून जातात असे संत महात्मा सांगतात पारद शिवलिंग हे छोटे मोठे कसेही असले तरी पुजनीय असते पण सव्वाकिलो पेक्षा जास्त असेल तर उत्तम परिणाम कारक व शीघ्र फलदायी ठरते।
पारद शिवलिंग हे छोटे मोठे कसेही असले तरी पुजनीय असते पण सव्वाकिलो पेक्षा जास्त असेल तर उत्तम परिणाम कारक व शीघ्र फलदायी ठरते. प्रत्येकाचे कुलदैवत शिवाचेच स्वरूप इतर अवतारात असते त्यामूळे कुलदेवताची सेवा त्यांचा आशिर्वाद सुध्दा याच्या पुजनाने प्राप्त होतात।
रूद्र सिध्दीमधे उल्लेख आला आहे की बाणासुराने पारद शिवलिंगाची पुजा करूनच मनोइच्छीत वर प्राप्त केला होता। रावणाने सुद्धा पारद शिवलिंगाची पुजा करूनच भगवान शंकरांना प्रसन्न् करून घेतले होते। शिवलिंगाची पुजातर सर्वच राजे महाराजे देवी देवता करतात। प्रभू श्रीराम श्रीकृष्ण हे देखील शिवलिंगाच्या पुजनानेच दिवसाची सुरूवात करत असत। महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा या विषयाचे अभ्यासक होते आणि त्यांच्या दरबारातील धर्माचे अभ्यासक हे उत्तम शिवलिंगाचे अभ्यासक होते। महाराजाकडे शास्त्रशुध्द पध्दतीने जसे सुचविले आहे तसे शिवलिंग त्यांनी बनवून घेतले होते व ते त्याची नित्यपुजा करूनच दिवसाची सुरूवात करत व जिथे प्रवासाला जायचे युध्दावर जायचे त्यावेळी ते कमरेतील शालूत शिवलिंग बांधुनच घराबाहेर निघायचे। सध्या ते शिवलिंग प्रताप गडावर भवानी मातेच्या मंदीरात दर्शनासाठी आहे। ज्यांच्या कडे असे शास्त्रशुध्द पध्दतीने व शिवपुराणात सांगितल्या प्रमाणे शिवलिंग आहे ते ते व्यक्ती आपल्या क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाचे काम करतात नाव व प्रसिध्दी आपोआपच त्यांना मिळत राहते। अशी वस्तू बनवने खुपच अवघड असते व ज्यांच्या कडे असेल त्यांच्या सारखा सौेभ्यागशाली जगात कुणी नाही। पारदशिवलिंग बनवताना वेगवेगळे पाच मंत्र सव्वा लाखाच्या पटीत जप करूनच बनवावे लागते त्या शिवाय त्याचे शुभ परिणाम मिळत नाहीत। योग्यवेळी योग्य जप केल्यास त्या शिवलिंगाचे तात्काळ शुभ परिणाम दिसतात। निर्दोष पारा ब्रम्हा स्वरूप मूर्च्छीत पारा विष्णू स्वरूप मृत पारा शिव स्वरूप असतो नंतर त्याला अमृत संजीवनी देवून त्याचे शिवलिंग बनवले जाते ते साक्षात शिवस्वरूप असते। विवाह होण्यासाठी या शिवलिंगावर बुधवारी एक मूठ अख्खे मूग व शनिवारी एक मूठ काळेतिळ वाहिल्याने चांगला जोडीदार मिळून शिघ्र विवाह होतो। पार्वतीने सुध्दा हीच पुजा केली होती।पारद शिवलिंगा बद्दल अनेक लोकांच्या मनात अज्ञानामूळे काही गैरसमज आहेत की त्याचे नियम खुप कडक आहेत किंवा शिवलिंग घरात ठेवू नये असे काहीच नाही भगवान शंकराला भोलेनाथच म्हटले जाते तो कधीही भक्तांचे अहीत होवू देत नाही। शिवलिंगाची पुजा घरात करू नये असे कुठल्याही शास्त्रात सांगीतले नाही की कुठल्याही गं्रथात तसा उल्लेख नाही की ऋषी परंपरेत कुठल्याही संतानी तसे सांगितले नाही उगाचच चुकीच्या भूल थांपाना बळी पडू नका व कुठलीही भीती मनात बाळगू नये। शास्त्रात सांगितले आहे पारद माळेने जप केल्यास दहा पट फळ प्राप्त होते। पारदाची प्रत्येक वस्तू बनवताना वेगवेगळया पद्धतीच्या झाडाच्या रसात बनवावी लागते त्याचे जपही वेगवेगळे असतात। पारद शिवलिंग पारद माळ पारद डमरू पारद नंदी पारद श्रीयंत्र पारद लक्ष्मी देवी देवतांच्या मूर्ती बनवतात
|| ॐ नमः शिवाय ||