बारा ज्योतिर्लिंगे

बारा ज्योतिर्लिंगे : सोमनाथ  ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन , महाकाल , ओंकर लिंग व अमलेश्वर लिंग, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यबकेश्वर ,वैधनाथेश्वर , नागेश्वर, रामेश्वर , घृश्नेश्वर 

शिवाची इतर पवित्र स्थाने :
गोकर्ण महाबळेश्वर : मार्नातक राज्यात बेळगाव व धारवाडच्या जवळपास शिवाचे हे पवित्र स्थान आहे.  येथील शिवलिंगास गायीच्या कानासारखा आकार प्राप्त झाला असल्यामुळे गोकर्ण असे संबोदले जाते.

कनकेश्वर : अलिबाग जवळ हे शिवाचे पवित्र क्षेत्र आहे. प्रत्यक्ष देऊळ कनकेश्वराच्या डोंगरावर आहे. ७०० पायऱ्या चढून जावे लागते. येथील लिंग टोकदार व खडबडीत आहे अवतीभोवती पाणी आहे.

चंद्रेश्वर (हृषीकेश ) : गंगेच्या पात्रात असलेले स्वयंभू शिवलिंगाचे  हे स्थान आहे आद्य शंकरांनी हे बांधले अशी श्रद्धा आहे .    

शिवकांची : कांची दक्षिणेस , या कांचीचे दोन भाग आहेत एक - शिवकांची , व एक विश्नुकांची . शिवमंदिर अवाढव्य व पाच गोपुरांनी युक्त आहे . मंदिराच्या बाजूस  शिवाची एकशे आठ शिवलिंगे आहेत.

नागनाथ : पुणे जिल्ह्यात भोरजवळ आंबवडे हे गाव आहे , तेथे हे मंदिर आहे. मंदिराच्या गाभार्यात दगडाचीच अतिभव्य व सुंदर स्वयंभू शिवाची पिंड आहे.

श्रीकरुनेश्वर :   अकोला जिल्ह्यातील वाशिम येथे हे पवित्र स्थान आहे

रायरेश्वर : शिवछत्रपतींनी स्व्राज्यचिओ शपथ घेतली ती येथेच.  आपली करण्गुली कापून तुअन्नि याच शिवलिंगावर स्वत:चे रक्त अर्पण केले. भोर्जवाच हे स्थान आहे.

वाघेश्वर : पुण्यापासून ३ ५  ते ४ ० किमी  अन्न्तारावर हे स्थान आहे . येथील शिवलिंग जमिनीत आहे . शिव्लीन्गाजवळ सदैव पाणी असते .

श्रीमंगेश (गोवा) : गोव्यातील निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर अत्यंत जागृत आहे.
श्रीहरिहरेश्वर : श्रीवर्धन तालुक्यात हे मदिर आहे. श्रीहरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुल दैवत. ब्रम्हा , विष्णू , महेश , व पार्वती यांची लिंगे येथे आहेत. निसर्गरम्य वनश्रीने नटलेल्या सहानंत परिसरात हे मंदिर आहे.
नारोशंकर(रामेश्वर ) : अतिशय सुप्रसिद्ध असे हे शिवमंदिर नाशिकला आहे. नारोशंकर राजाबाहाद्दूर यांनी हे मंदिर बांधले आहे त्यावरून हे नाव पडेल आहे.  येथे शिवापुढे नांदी मात्र नाही.
शिखर शिंगणापूर : सातारा जिल्ह्यात दहिवडी येथुन जाल्वाच हे प्रसिद्ध मंदिर आहे . हे देवालय यादव कालीन आहे . शिव व पार्वती यांच विवाह येथेच झाला अशी भक्तांची एक श्रद्धा आहे .  मंदिरात दोन लिंगे असून ती शिव - पार्वतीची आहेत  व ती स्वयंभू आहेत.